आदेश / फ़तवे

 


माझ्या माहिती प्रमाणे/वाचनाप्रमाणे सर्वच धर्मा मध्ये सगळे आदेश / फतवे हे त्या त्या धर्माच्या मूळ व्यक्तीने अथवा वेद-पुराण-कुराण अथवा पंडित-पुजारी-मुल्ला ह्या लोकांनी दिलेले असतात व सामान्य लोक-जनता ही त्या त्या आदेशाचे पालन करण्यातच मोक्ष पाहते.... जन्नत पाहते... हेही पाहत नाही की जे आदेश-फतवे आपण आपल्या जीवनामध्ये उतरून घेत आहोत ते बरोबर की चूक.........


लोकांना जर ह्या गोष्टीमधील कमतरता-चुका दाखवल्या - समाज-प्रबोधनाचे प्रयत्न केले अथवा कायदा उभा केला की जनता मग हळूहळू कु-रितीना बाजूला करत जाते.... खूप उदाहरणे आहेत.... सती-प्रथा, बाल-विवाह, आंतरजातीय विवाह.... ह्या गोष्टी तश्या समाजाने समजून घेतल्या आहेत.... व ह्या प्रथा आता काल बाह्य झाल्या आहेत....


व जेथे जेथे ह्या गोष्टी आहेत तेथे फक्त शिक्षणाची व राजकीय समीकरणांचीच कमतरता आहे.


मला जे वाटले ते लिहिले आहे.... आपल्या सर्वांचे मत अपेक्षीत आहे...