लालू, व्यवस्थापक - भारतीय रेल्वे

लालू आय. आय. एम्. (अहमदाबाद) येथे व्याख्यात्याच्या नात्याने हजेरी लावणार आहे. बातमीचा दुवा


"आम जनतेशी असलेले लालूचे नाते" किंवा "बिहार - भारत वि. इन्डिआ" असा काहीसा विषय असेल असा अंदाज केलात तर साफ चुकलात... (म्हणजे मी तरी अगदी असाच फसलो!)


सुखद आश्चर्याची बाब म्हणजे फायदा/तोट्याचे रोखठोक गणित एक केंद्रीय मंत्री या नात्याने लालू मांडणार आहे. रेल्वे ही जनसेवेसाठी -- निव्वळ फायद्यासाठी नाही -- असल्याने ती बुडीत खात्यातच राहणार असे मानले जात असे. त्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात रेल्वेखात्याने रु. १५,००० कोटींचा फायदा नजरेत भरण्यासारखा आहे. आनंदाची गोष्ट आहे!!


यानिमित्याने काही विचार जाणकारांनी मांडावेत ही अपेक्षा -


(१) PSU (मराठी?!) म्हणजे तोटाच या गृहीतकांस आव्हान देणारी भारतातील/जगातील काही उदाहरणे...


(२) रेल्वेच्या ह्या फायद्याचे विश्लेषण -
(२.१) दिशा बदलणारे (pathbreaking!);
(२.२) तात्पुरते;
(२.३) फसवे;
(२.४) अन्य ...


(३) लालू!
(३.१) अभिनंदन(!) /टीका(?)
(३.२) अन्य कार्यक्षम मंत्री/राजकारणी


(४) आय. आय. एम्...