अ = ब

हे एक जुने कोडे आहे. शाळेत शिकलेल्या गणिताच्या (जुजबी?) ज्ञानाआधारे थोडीशी मौजमजा...


समजा, अ = ब असेल तर...


अ = ब


अ*अ = अ*ब


अ(वर्ग) = अब


अ(वर्ग) - ब(वर्ग) = अब - ब(वर्ग)


(अ-ब) (अ+ब) = ब(अ-ब)


(अ+ब) = ब


(अ+अ) = अ


२अ = अ


२ = १


आँ, हे कसं शक्य आहे? काहितरी घोटाळा झालेला दिसतो, पण कुठे?


(अबब) मिलिंद२००६