ओळखले मी...


ओळखले मी
तुला, तरी पण
दाखवले ना तसे...
सांग करावे
अजुन कितीदा
स्वतःचेच मी हसे!...


तू नसण्याच्या
बेचैनीतच
कविता रचतो मी...
तू असल्यावर
सांग मला गे
सुचेल काही कसे?