वऱ्याचे तांदुळ

  • १ वाटी वऱ्याचे तांदुळ
  • मूठभर दाण्याचे कूट,
  • मूठभर चिरलेली कोथिंबीर, मूठभर खवलेला ओला नारळ
  • १ तिखट मिरची, साजुक तूप २-३ चमचे
  • जिरे १ चमचा, ५ वाट्या पाणी
  • मीठ
३० मिनिटे
२ जणांना

सर्वात आधी वऱ्याचे तांदुळ धुवून घेणे आपण भाताला धुवून घेतो तसे. साजुक तूपामध्ये जिरे, मिरचीचे तुकडे, व वऱ्याचे तांदुळ घालून थोडे परतणे मध्यम आचेवर. नंतर त्यामध्ये ३ वाट्या पाणी घालून शिजवणे. थोडे शिजत आले की त्यात कोथिंबीर, नारळ, दाण्याचे कूट, चवीपुरते मीठ व अजून २ वाट्या पाणी घालून सर्व मिश्रण कालथ्याने ढवळणे. पाणी आटत आले की गॅस मंद करून झाकण ठेवणे. १० मिनिटांनी गॅस बंद करणे.

वऱ्याचे तांदुळ लवकर शिजतात, पण गार झाले की खूप घट्ट होतात म्हणून जास्त पाणी घालावे लागते.

रोहिणी

वऱ्याचे तांदुळ पाणी जास्त घालून केले की नुसते पण खायला छान लागतात. दाण्याची आमटी केली नाही तरी चालते. उपासाला खातात. काहीजण याला भगर म्हणतात. 

सौ पारखीवहिनी