वाग्वैजयंती— अर्पण-पत्रिका




अर्पण-पत्रिका
सत्–चित्–हृत-महत् आनंद–पदवी–प्रदान–वदान्या ||
प्रीतीची पवित्रता, चिरंतनाची चरित्रता,
सृष्टीची सचित्रता,
विश्वाची विविधता, अनंताची अगाधता,
ईश्वराचे अस्तित्व
या सर्वांच्या अचल ऐक्याची
प्रत्यक्ष निदर्शना ||
भूतकालांतली भावजीवना, वर्तमानांतली वरतराशा,
भवितव्यांतली भाग्यदेवी ||
हृदयाची स्फूर्ति, इच्छेची पूर्ति, मांगल्याची कीर्ति ||
श्रीहृदयशारदा
ही सर्वस्वाने अर्पिलेली
"वाग्वैजयंती"
सदैव कंठात धारण करो !
              

 — गोविंदाग्रज