झापिले

का, सुगंधे, तू मला नाकारिले ?
हाय, का हृदयात तुजला स्थापिले

तिंबले रस्त्यात मज तव बंधुनी
एकही ना हाड जागी राहिले

रोज तव सुंदर सखी मज खुणविते
आज थोडे पाय माझे घसरिले

पाहता सौष्ठव तुझे मी चोरुनी
दडपुनी ओठात स्मित तू झापिले

खोडसाळा, काय हे, बघतील ना
अंबरातुन तारकांचे काफिले


प्रेरणा - मानस६ ह्यंची गझल काफिले