कोथिंबिरीच्या वड्या

  • चिरलेली कोथिंबिर ४ वाट्या
  • २ वाट्या डाळीचे पीठ
  • २ टेबलस्पून कणिक
  • १ टेबलस्पून कच्चे पांढरे तीळ
  • २ टेबलस्पून लाल तिखट
  • २ टीस्पून मीठ
  • पाव टीस्पून हळद
  • २ वाट्या तळाणीकारता तेल
३० मिनिटे
साधारण १५ वड्या

कोथिंबीर व वरील सर्व साहित्य घालून पीठ घट्टसर भिजवा  व चांगले मळून घ्या. त्याचे लांबटसर चपट्या आकाराचे ४-५ गोळे करा. ताटलील/ चाळणीला तेलाचा हात लावून केलेले गोळे त्यात ठेवा व १५ -२० मिनीटे उकडून .  गार  झाल्यावर अर्धा इंच रुंदीच्या  वड्या कापा व तेलात तळा. जास्त कडक करू नका. या वड्या घट्ट  झाकणाच्या डब्यात ठेवल्यास ८-८ दिवस टिकतात.

कोबी ,पालक, मेथी यांच्या अशाच वड्या करता येतात. 

-