वारसदार कोण?

संगितातले दिग्गज जेव्हा राज्य करीत असतात तेव्हा त्यांच्यापुढे दुसरे ऐकावयास मन घेत नाही.  पण ते गेल्यावर त्यांचे वारसदार कोण हा प्रश्न अपवादानेच सिद्ध होतो.  दोन अडिच वर्षांपूर्वी सतारमहर्षि विलायतखाँ गेले नुकतेच सुवर्णसनईकार बिस्मिल्लाखाँ पण काळाच्या पडद्याआड गेले.  या अनुषंगाने Outlook India या नियतकालिकात एक लेख आला आहे तो अवश्य वाचण्यासारखा आहे.


दुवा


त्यात पं. रविशंकर, पं. गंगुबाई, पं. भीमसेन, पं हरिप्रसाद, पं. शिवकुमार, पं जसराज, उ. अकि अकबरखाँ इत्यादि मातब्बर कलामहर्षींचे वारसदार दिसत नाहीत याची खंत केली आहे.

तसे उ. अमजाद अली खाँ आपल्या मुलांना लहानपणापासून रंगमंचावर पुढे आणत आहेत.  विलायत खाँसाहेबांनी पण त्यांच्या मुलाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला पण तशा तोलाचा विद्यार्थी/वारसदार अजून तयार झाला नाही असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते.

कुमारांचा मुलगा किंवा गजाननरावांची मुले यांना जर त्यांच्या वडिलांचे असे प्रोत्साहन मिळाले असते तर ते वारसदार म्हणून पुढे येऊ शकले असती अशी हुरहूर वाटत राहते.  तशी त्यांची क्षमता निश्चित होती/आहे.

हा लेख थोड्या वेळापूर्वी वाचला आणि आताच ई-सकाळमध्ये पं भीमसेनांची तब्येत चिंताजनक झाली असे वाचले  आणि मनात पाल चुकचुकली.

पंड़ितजी यातून बरे व्हावेत अशी देवाकडे मनःपूर्वक प्रार्थना करतो.

सुभाष