वाळकाचा भात

  • २ वाट्या तांदुळ
  • १ मोठा वाळुक
  • फोडणीसाठी तेल, जीरे-मोहरी, हिरवी मिर्ची, कढीपत्ता, हळद, हिंग
  • धने-जीरे पुड- दीड चमचे
  • चवीनुसार मीठ
  • कोथींबीर
३० मिनिटे
२-३

तांदुळ १ -दिड तास पाण्यात भिजत ठेवा. वाळकातील बीया काढून त्याचा किस करून घ्यावा. एका जाड बुडाच्या भांड्यात  फोडणीसाठीचे सर्व साहित्य टाकुन फोडणी करुन घ्यावी, त्यात धने-जीरे पुड,  वाळकाचा किस , भिजत घातलेले तांदुळ पाणी न घालता टाकुन परतने जेणे करुन मसाला तांदुळाला लागेल. भांड्याचे झाकण लावावे, बारीक गॅसवर २० -२५ मिनीटासाठी ठेवावे, या दरम्यान  झाकण अजीबात काढु नये,जेणे करुन वाफ बाहेर जावु नये. २५ मिनीटा नंतर झाकण काढुन पाहवे ,कोथींबीर टाकावी.  साध्या वरणा बरोबर पापड ,किंवा बुंदी रायत्या सोबत खायला देणे.

वाळकाला शिजताना पाणी सुटते त्यामुळे भिजलेले तांदुळ  त्या पाण्याच्या वाफेत छान शिजतात. हवा असल्यास गरम मसाला पण टाकावा.

हा भात बारीक गॅसकरुन शिजवावा,अथवा बुडाला करपण्याची शक्यता असते.

वाळकाला नैसर्गिक आंबुसपणा (थोडा) असतो, त्यामुळे त्याच्या पाण्यात मोकळा शिजलेला हा भात फार छान लागतो.

वाळकाऐवजी दुधी (कद्दु) वापरुन पण हा भात करता येतो, कारण दुधीला पण पाणी सुटते, त्यात लिंबाचा रस टाकावा.

मराठवाड्यात वाळुक खुप प्रमाणात मिळतो, त्यामुळे त्याच्या अनेक पाककृती प्रकारा पैकी हि एक.

माझी आई