'प्रेमाला उपमा नाही' - एक असंबद्ध कविता ;)

प्रेमाला उपमा नाही ।।


उपम्यात साखर नाही ।


साखरेला ऊस नाही ।


ऊसाला पाणी नाही ।


पाण्याला पंप नाही ।


पंपाला वीज नाही ।


वीजेला पैसा नाही ।


पैशाला काम नाही ।


कामाला नोकरी नाही ।


नोकरीला पदवी नाही ।


पदवीला कॉलेज नाही ।


कॉलेजला पोरी नाही ।


पोरीला प्रेम नाही ।


प्रेमाला उपमा नाही ।।


;)


- मोरू