ही कविता लेखनप्रकार चुकीचा निवडल्याने अथवा अन्य काही कारणास्तव
बालगीत या काव्यप्रकारात प्रकाशित झाली आहे.प्रकाशकांना विनंती आहे की, त्यांनी कृपया सदर कविता "कविता " या लेखनप्रकारात प्रकाशित करावी.
व्यथा
जीवना अशी कशी रे
मजवरी ही वेळ आली...
माझी ललाट रेषा
दुसऱ्या घरात गेली....!
स्वप्नांच्या उभारील्या
कित्त्येक उंच माड्या..
दारावरुन माझ्या
त्यांची वरात गेली.....!
माझिया नयानांतील
दिसली आसवे न कोणा..
मिसळुन किंकाळी माझी
सनईच्या सुरात गेली....!
उरला न माझ्यावरी
माझाच कैसा ताबा.....
फ़सवून कट्यार मजला
माझ्या उरात गेली.....!!!!
अरुणकुमार