महाजालाची भाषा - भाग १

महाजालावर वावरण्यासाठी थोडे फार महाजालावरच्या भाषेची गरज भासते, हा विचार करूनच मी येथे थोड्या थोड्या विभागामध्ये महाजालाची माहिती शब्द बद्ध करीत आहे.


प्रथम भाग :


I.P. No. तुम्ही तुमच्या संगणकावर अथवा महाजालावर वावरताना खूप वेळा हा शब्द वाचला असेल. I.P. No. म्हणजे एखाद्या संगणकासाठी महाजालावरची एक ओळख-पत्राचे काम करणारा नंबर हा थोड्या फार फरकाने असा असतो उदा. १२८.०.०.१. जेव्हा  संगणक महाजालाशी जोडणी करतो तेंव्हा  तुमच्या संगणकासाठी एक I.P. No. तयार होतो व त्या संबंधी माहिती ही सेवादात्याच्या मुख्य संगणकावर सुरक्षित होते.


संकेतस्थळाचे नाव:


तुम्ही लिहीत असलेल्या संकेतस्थळाचा पत्ता हा नेहमीच I.P. No. मध्ये असतो पण सर्व सामान्याना वापर करताना अडचण होऊ नये व वापरास सोपे व्हावे ह्या साठी Domain Name ही सुविधा तयार केली गेली, हे नाव मूळ रूपामध्ये I.P. No. चं असतो, जसे जर तुम्ही तुमच्या संगणकाच्या RUN ह्या आदेशावर टिचकी माराल व ping yahoo.com असा आदेश द्याल तेंव्हा तुम्हाला pinging yahoo.com  [216.109.112.135]  with ३२ bit ......... असा संदेश दिसेल, जे क्रमांक दिसत आहेत तो याहूचा ओळख क्रमांक आहे.


संकेतस्थळ व त्याला आवश्यक जागा : 


कुठले ही संकेतस्थळ चालू करण्यास दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्याच लागतात  १. आपल्या संकेतस्थळाचा वापर कसा होणार आहे? २. ते स्थळ तुम्ही स्वतः साठी वापरणार आहात की सार्वजनिक कामासाठी ? (उदा. मनोगत)


प्रथम आपण असे समजू की तुम्हाला हे स्थळ स्वतःसाठी व आपल्या मित्र-मंडळी साठी तयार करावयाचे आहे. तर प्रथम तुम्हाला असा सेवादाता शोधावा लागेल ज्याच्या कडे आपण आपले संकेतस्थळ व त्याला लागणारी जागा घेणार आहोत, जो स्वस्त व चांगली सेवा देत आहे त्यालाच पकडा :))
जेव्हा सेवादाता भेटेल तेंव्हा सगळ्यात महत्त्वाचे काम आपल्या संकेतस्थळाचे नाव व त्याची उपलब्धता सध्या संकेतस्थळाचे नाव ठरवणे व तेच नाव मिळणे म्हणजे देव भेटल्याचा आनंद. तरी ही आपल्याला नाव मिळाले समजा www.shani.com, ह्यासाठी तुम्हाला एका वर्षासाठी २०० रु. ते ५०० रु. मोजावे लागतात . ह्याच्या नंतरचे महत्त्वाचे कार्य म्हणजे ह्याला हवी असलेली जागा अहो जागा कशाला काय आपले संकेस्तस्थळ काय हवेत राहणार नाही आहे त्याला जागा ही हवीच त्यालाच hosting असे म्हणतात, हे निवडताना जरा काळजी घ्यावी लागते कारण ह्या जागेवरच सर्व काही अवलंबून आहे, समजा तुमच्या संकेतस्थळावर महत्त्वाची ४-७ पाने आहेत (उदा. स्वगृह, मी व परिवार, माझे काम, इत्यादी.) तर तुम्हाला जास्त जागेची गरज नाही आहे पण मी जेव्हा अशा सेवादातांच्या संकेतस्थळावरून फेरफटका मारला तेंव्हा लक्षात आले की सर्व सेवादाता जी कमीत कमी जागा देतात ती 5MB तरी असतेच ह्यासाठी तुम्हाला वर्षासाठी ६०० रु. ते ८०० रु. द्यावे लागतात.  ह्या मध्ये दोन प्रकार आहेत  १. windows hosting  २. Linux Hosting ह्यातील तुम्हाला जे गरजेचे आहे ते घ्यावे पण सामान्यता १ नंबरची जागा सर्वांनाच उपयोगी आहे कारण ह्यावर संकेतस्थळासंबंधी सर्व प्रणाली कार्य करते उदा. ASP,PHP, DOT NET वैगेरा. जर तुमच्या संकेतस्थळावर तुम्ही वापर करत्याची माहिती साठवून ठेवण्याची अथवा पत्र वैगेराची सुविधा देत आहात तर तुम्हाला हेही पाहावे लागेल की तुमचा सेवादाता ह्यासाठी लागणारी प्रणाली देत आहे का नाही (database etc.) ह्या नंतर तुम्हाला जरूरी माहिती दिली जाते, तुम्हाला तुमच्या संकेतस्थळासाठी लागणारा परवलीचा शब्द व आपले संकेतस्थळ कसे व कोठून संलग्न करावे ह्याची माहिती जेव्हा मिळेल तेंव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने ते संकेतस्थळ व ती जागा तुमच्या अधीन झालेली असेल.


संकेतस्थळाची बांधणी :-


सर्व जोडणी झाल्यावर मग चालू होते संकेतस्थळाची रूपरेखा व दिसणार भाग ह्याची बांधणी. ह्यासाठी तुम्हाला कमीत कमी HTML ह्या भाषेची माहिती हवी व ते कसे वापरायचे ह्याची माहिती...... क्रमशः