आपली स्वप्ने सगळीच खरी
अन दुसर्याची दिखावा असतो,
आपले जगणे "जगणे"असते
बाकी सारा भुलावा असतो.
स्वप्नांना तुटण्याची झळ बसते
तेव्हा स्वप्नांची किंमत समझते,
जशी कविता संपल्यावर
तिच्यातली गंमत समझते.
म्हणुनच मी कोणावर हसत नाही
स्वप्नं मी ही पाहतो,
स्वप्नं वजा झाल्यावर जगण्यात
फ़क्त आभास राहतो...