कारल्याची भाजी

  • पाव किलो कारली,
  • चिंच ४-५ छोटे तुकडे, गुळ (सुपारी एवढा),
  • मीठ, दाण्याचे कुट २ चमचे,
  • तेल, मोहरी, कडीपत्ता, हळद, हिंग,
  • गोडा मसाला अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा,
  • कोथिंबीर, खोबरे (आवडीप्रमाणे)
३० मिनिटे
२ जणांना

कारली धुवुन घ्यावीत.  नंतर कारल्यामधील बिया काढून टाकाव्यात आणि त्यांचे चौकोनी बारीक तुकडे करुन घ्यावेत. चिरलेल्या कारल्याला अर्धा चमचा मीठ लावून १०-१५ मिनीटे ठेवावे.

चिंच पाण्यात भिजवून ठेवावी.

आता कारल्याला पाणी सुटले असेल, कारल्याचे तुकडे घट्ट पिळून पाणी काढून टाकावे. यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल.

आता फ़ोडणी साठी पातेले गरम करावे. मग तेल, मोहरी, कडीपत्ता, हळद, हिंग घालावे.

नंतर त्यात कारल्याच्या फ़ोडी, चिंच कोळून त्याचे पाणी, गुळ, मीठ, गोडा मसाला, लाल तिखट टाकावे. चांगले परतावे.

आणि १० मिनीटे झाकून ठेवावे. मधून मधून हलवावे. वरुन पाणी घालू नये.

नंतर दाण्याचे कुट, कोथिंबीर, खोबरे (आवडीप्रमाणे) घालावे.

कारल्याची भाजी तयार.

आणि गरम भाकरी बरोबर खावून बघा, मला नक्की कळवा.

 

हि भाजी आजिबात कडू लागत नाही.

आवडत असल्यास शिळ्या भाकरी बरोबर खावून बघा, वेगळी मजा येते.

 

आई आणि आजी