जखम

किती दिवस झालेत ,
जखम होऊन ........,
ही जखम नाही भरत
कळेना अजुन का खपली नाही धरत ...?
मीच जपते तु दिलेल्या , चॉकलेटच्या चांद्या
तुझ्या हस्ताक्षरातलं , कुठलसं चिठकुर
तुझ्या श्वासाचा गंध घेऊन , आलेलं वारं
जपते सारं सारं , तशीच तु दिलेली जखमही ,
भळभळणारी ......