वाद-चर्चा, वाटाघाटी, अहवाल, यांतील अप्राणिकपणा.

वाद-चर्चेतून विचारमंथन व अचूक मार्गदर्शन अपेक्षित असते, वाटाघाटींतून मतभिन्नता असणाऱ्या पक्षांमध्य परस्परांना मान्य होणारा तोडगा निघणे अपेक्षित असते, तर अहवालांतून सद्य:स्थितीचे यथार्थ वर्णन अपेक्षित असते. पण यासर्वांत संबंधित प्क्षांकडून हेतुत: अनेक अप्रामाणिक युक्त्यांचा वापर केला जातो ज्यामुळे मूळ उद्देश बाजूला राहतो व दिशाभूल होणे, चर्चा निष्फळ होणे असे प्रकार होतात. अशा अडतीस (३८) अप्रामाणिक युक्त्या व त्यावरील उपाय रॉबर्ट थॉलेस यांच्या "स्ट्रेट अँड क्रुकेड थिंकिंग" या पुस्तकांत दिल्याआहेत. त्यांतील काही युक्त्या खालीलप्रमाणे आहेत.
१) एखाद्या वर्गांतील 'काही' जणांना लागू असणारे वर्णन त्या वर्गांतील सर्वांना लागू करून बेधडक विधाने करणे. उदाहरणार्थ, सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारीअसतात असा सार्वत्रिक समज आहे. अशा वेळी चांगले काम करणार्या प्रामाणिक अधिकाऱ्याविषयी बोलतांनाही प्रथम तो भ्रष्टाचारी आहे असे समजूनच त्याच्याविषयी बोलणे. ("तळे राखील तो पाणी चाखल्याशिवाय राहील का? अशी शेरेबाजी करणे)
२) खोटी तडजोड पुढे करणे- स्वत:ची भूमिका चुकीची व स्वार्थीपणाची आहे हे माहीत असतांनाही बरोबर भूमिका घेणारा टोकाची भूमिका घेत आहे असे भासवून मानभावीपणाने म्ध्यममार्ग तड्जोड म्हणून पुढे करणे व बरोबर भूमिका घेणार्याने"तडजोड" नाकारली तर तो आडमुठेपणा करतो असा कांगावा करणे.
३) चर्चेंत असलेल्या "क्ष" समस्येची चर्चेंत नसलेल्या "य" समस्येशी गल्लत करणे.
काही महिन्यांपूर्वी बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न दूरदर्शनवर चर्चेला घेतला होता.त्यांत एक विचारवंत जेव्हा अडचणींत आले त्यावेळी त्यांनी घुसखोर नसलेल्या बहुसंख्य नागरिकांबद्दल आपण काय केले असा (त्या संदर्भांत) गैरलागू प्रश्न उपस्थित करून स्वत:ची सुटका करून घेतली होती.
४) संदर्भ तोडून प्रसंगाचे वर्णन करणे - याचे एक (अतिशयोक्तिपूर्ण) उदाहर्ण पु. ल. देश्पांडे यांच्या पुस्तकांत दिले आहे ते असे, नारायणरावाने साखरभात खाल्ला म्हणून त्याचा खून झाला. दुसरे प्रत्यक्षांतले उदाहरण असे आहे. काही वर्षंपूर्वी नागपूरच्या मोवाड तालुक्यांत पूर आला होता. त्याची पहाणी करून व दिवसभर अनेक सभांना उपस्थित राहून नागपूरला परत येतांना रात्री उशीरा वाटेंत असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण घेतले. त्यांत कदचित चिकन मागवले असावे. दुसरे दिवशी वर्तमानप्त्रांत एक मथळा बातमी झळकली. "पूरग्रस्तांचे हाल होत असतांना
कमिशनर साहेब मुर्गीवर ताव मारीत होते".
५) चुकीचे साधर्म्य- सार्वजनिक पैशावर इतरांचा न्यय्य हक्क डाव्लून आपल्याच भागाकडे पैसा वळवून स्व्त:चा विकास करून घेणे व कोणी तक्रार केल्यास त्याच्यावर(पायओढणार्या) खेकडा प्रवृत्तीचा आरोप करणे. न्याय्य मोबदल्याच्या मागणीवर "मधुमेह झालेल्याने मिठाई मागितली तर ति देणे योग्य आहे का?" असा प्रश्न उपस्थित करून हक्क नाकारणे.
६) निवडक पुरावाच विचारांत घेणे व आपल्या भूमिकेला प्रतिकूल ठरणारा पुरावा दडपूनटाकणे.
७) सिद्ध न झालेली गोष्ट गृहीत धरून त्यावरून काढलेली अनुमाने खरी आहेत असा दावा करणे.
८) सुरवातीला पटणार्या गोष्टी सांगून हळूच एखादी न पटणारी गोष्ट घुसडणे.
९) लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नसलेले संदर्भ देणे व बेधडक विधाने करणे.
आपल्याला अशा गोष्टी आढळून येतात का?