रामा रघुनंदना

रामा रघुनंदना


आश्रमांत या कधिं रे येशिल


रामा रघुनंदना ॥धृ॥


मी न अहिल्या शापित नारी


मी न जानकी राज कुमारी


दीन रानटी वेडी शबरी


तुझ्या पदांचे अखंड चिंतन


ही माझी साधना ।१॥


पतितपावना श्री रघुनाथा


एकदांच ये जातां जातां


पाहिन, पूजिन, टेकिन माथा


तोच स्वर्ग मज, तिथेंच येइल


पुरेपणा जीवना ॥२॥


गायिका : आशा भोसले


गीतकार : ग. दि. माडगुळकर


संगित : दत्ता डावजेकर