तुझी भेट



तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. बऱ्याच दिवसांनी आलेय एक कविता घेऊन. स्वीकारा करावा.



तुझी भेट


तिन्हीसांजेच्या ह्या कळ्या
फुलू लागती नभात
तसा साजणसखया
उगवतो अंगागांत

आणि होते तगमग
माझी सारखी घरात
माझ्या स्पंदनाने जुई
थरथरे उंबऱ्यात

रोमारोमांत मोगरा
असा सुवासून जातो
आणि अंगणी प्राजक्त
मग ओसंडून जातो

किती तुला रे भेटण्या
हुरहुर, हुलहुल
किती जाऊन दारात
अडखळते पाऊल

तुझे येणेही अताशा
माझ्या मावेना दिठीत
माझ्या डोळ्यांत बघून
मला घेशील मिठीत

-चारू