झब्बू - २

मद्य भरा वा पाणी
वा ताकासोबत लोणी
लिंबू, कोकम, कैरी
अन् काढा, औषध वैरी
रस भरपूर फळांचे
की स्वाद दूध, लस्सीचे

भरून घ्या काचेचा पेला
सदैव ठेवा बरबटलेला
जरा रिकामा दिसे कुणाला
चहाने तरी भरा तयाला

कारण कोणी सांगून गेला
हृदय आपुले आहे पेला!