झब्बू - ४

ह्यांना पद्य आवडले
त्यांना गद्य आवडले
आम्हा रसिकांना तर मद्य आवडले

ह्यांनी सल्ला मागितला
त्यांनी गल्ला मागितला
आम्ही भाबड्यांनी देव, अल्ला मागितला

ह्यांनी वास घेतला
त्यांनी घास घेतला
आम्ही मूर्खांनी बौद्धीकाचा तास घेतला

ह्यांना आम्ही 'हे' म्हटले
त्यांना आम्ही 'ते' म्हटले
तरी त्यांनी आम्हाला आपले  म्हटले!