दिवाळी च्या सुट्ट्या संपत आल्या.. तश्या काहींना सतत सुट्ट्याच अस्तात म्हणे...फराळ ही संपत आलाय...तसं बोलावंलं नव्हतंच कुणाला. कुणी काही कामा निमित्तानं आलं असेल आणि त्याला फराळ च द्यावा असा माझ्या मनात विचार येतो न येतो तोच तर घरातून दोन वेळा खाणाखूणा व्हायचा आणि मग अंतिम निर्णय...त्यातले टाकाउ मेनू म्हन्जे न खपणार मेनू पाहुण्या मीत्रांना आग्रहाने पुन्हा पुन्हा दिला उदा. चिवडा भरपूर मुरमुरे असलेला.....मनोगतावर तर मी या १५ दिवसांत वर्ष भरात आलो नसेल इतक्या वेळा आलो..वाचावं वाटणार आणि न वाचावं वाटणार असं सगळेच वाचून काढले....दिवाळी अंक विकत घेतले दोन, तेही चाळून झाले... परवडतं नाही विकत घेऊन वाचायला तरीही घेतले. सवय वाईट लागलीय हो, बाकीचे ग्रंथालयातून घरी आणून ठेवायचे..वाचणं होऊ का ना होऊ.. .......आता मलाही सुट्ट्याचा कंटाळा आलाय... बाकी आपल्या कडे काय परिस्थिती आहे...