बातमी तुझ्या येण्याची जेव्हा कळू लागली
कशी प्रत्येक चीज इथली बघ दरवळू लागली
पाना फुलांस इथल्या बहुतेक चाहूल लागली
वाऱ्यासवे डोलूनी ती हि सळसळू लागली
रातराणी का अशी आताच फुलूनी आली
वाटते तिन्हीसांज हि अवेळीच ढळू लागली
आले कुठून इतके असे हे तेज चांदण्यास
जाऊन चांदणीस ती चांदणी मिळू लागली
ठाऊक असूनही मला वेळ तुझ्या येण्याची
नजर तुझ्या वाटेवर का सारखी खिळू लागली
अजय