मते

जितकी शिते
तितकी भुते
जितकी भुते
तितकी मते

हिरवी मते
पिवळी मते
निळी मते
भगवी मते
माणसं कुठली
नुसती प्रेते

ह्याला जोड
त्याला फोड
त्याला मोड
ह्याला तोड
फक्त इथे
लाज सोड


जितकी प्रेते
तितकी भुते
जितकी भुते
तितकी शिते
जितकी शिते
तितकी मते