खोल खोल
आत आत
उठते जेव्हा
एक कळ
मन माझे
म्हणते तेव्हा
दूर पळ दूर पळ
ऍडम आणि ईव्हला
टाळू म्हणून टळलं नाही
तुझी माझी गत गं
त्यांच्याहून वेगळी नाही
झाडावरती आज पुन्हा
पिकलं आहे एक फळ
मन माझे म्हणते तेव्हा
दूर पळ दूर पळ
कधीसुद्धा संपू नये
अशी एक रात्र येईल
बुद्धी तेव्हा आपली सारी
गलितगात्र होईल
वासनेच भूत तेव्हा
भावनेला लावेल चळ
मन माझे म्हणते तेव्हा
दूर पळ दूर पळ