वेदना माझी पुन्हा बहरात आहे
तू दिलेल्या दुःखाच्या कहरात आहे
ही न माझ्या स्वप्नांची प्रेतयात्रा
ही तुझ्या पराभवाची वरात आहे
हा न वर्षाव तुझ्या माघाचा
ही माझ्या आसवांची बरसात आहे
नेमला रामशास्त्री त्यांनी खुनास माझ्या
कोणता मग गारदी न्यायालयात आहे
काढले आयुष्य मी विकाण्यास माझे
लाट मंदीची पुन्हा बाजारात आहे