हळूवार तुझे पाऊल
मला चाहूल
तरीही उराशी
होईल पहाट
नको जाऊस
थांब जराशी
उतरो न कधी ही धुंद
श्वासात गंध
रात्रीचा
हा असाच चालो
नसा नसात उत्सव
प्रीतीचा
आकंठ बुडूदे डोळ्यात
तुझ्या देहात
मला खोल
ते खुजे लाजरे
शब्द नको
स्पर्शाने बोल
हे स्वप्न जरी वाटे
कशास खोटे
बोलू तुझ्याशी
ठेवलीत जपून मी
फुले सापडलेली
उशाशी
- अनिरुद्ध अभ्यंकर