पित्तापरी तुझ्या उदरी मळमळणारे

प्रेरणा: चित्त यांची अप्रतिम कविता "चंदनापरी मज, माझ्यावर जळणारे"
http://www.manogat.com/node/8636 


मात्राप्रेमींनी चू.भू.द्या.घ्या.


१...


पित्तापरी तुझ्या उदरी मळमळणारे
टाक तू ओकून सर्व जळजळणारे


कश्या  धावा फलंदाजांनी कराव्या
टाकले त्यांनी चेंडू  सरपटणारे


भरभरा गेलो मी त्याच वाटेने
जिकडून आले बेवडे बरळणारे


आता कशाला हवी दारूची दुकाने
मिळेल वाण्यांकडे मद्य फेसाळणारे


मला कसा लागला नाद विडंबनाचा
आटले शब्दांचे झरे खळखळणारे


२...


हे स्तुती सुमने उधळणारे
बोचले कट्यापरी मला भेटणारे


झाली स्वप्ने बेचिराख माझी
शब्द होते तुझे आग लावणारे


तक्रार ही नेहमी होती फुलांची
निष्ठुर हे लोक कळ्या तोडणारे


वाटले किती लपवशील अश्रू
फितूर हे डोळे तुझे बोलणारे


मी कसा विश्वास ठेवू स्वतःवर
संपले केव्हाच शब्द पाळणारे


           - अनिरुद्ध अभ्यंकर