महागलेले आताशा पाव होते: श्वापद -२

प्रेरणा:  सारंग यांची सु रे ख कविता "श्वापद"
http://www.manogat.com/node/8638
मात्राप्रेमींनी चू.भू.द्या.घ्या.


महागलेले आताशा पाव होते
बिस्किटांचे ही वाढलेले भाव होते


शेकडो वेळा हरलो तरी
तीन पत्तीचे सुरू डाव होते


येते जिथे नळातून दारू
झिंगलेले स्वप्नात माझ्या गाव होते


लोळती तर्र होवूनी गटारी
शुद्ध असल्याचे त्यांचे आव होते


घेतले कितीही चाटणे-काढे
तरी त्यांना अजून आव होते


चिडतील आता प्रस्थापित सारे
लिहिताना हे मला ठाव होते


लिहिली दुसऱ्यानेच कविता
फक्त माझे लावलेले नाव होते


     - अनिरुद्ध अभ्यंकर