उपसर्ग !

उपसर्ग


उपसर्गानी शब्दाचा अर्थ तो बदलतो पुरा ।
प्रहाराहारविहार संहारापरी तो स्मरा ॥


'प्रहार' करीतो वार, 'आहार' भूक भागवी ।
'विहार' घडवी संचार, 'संहार' नाहीसे करी ॥


कार, कार्य, काज, काम उपसर्गे त्रस्त सर्वही ।
एकेकाची गती पाहू, अर्थ ते बदलती कसे ॥


'सत्कार' करी सन्मान, 'बेकारा' तो न लाभतो ।
'आकार' घडवितो दर्शन, 'प्रकार' वेगवेगळे ॥


'सत्कार्य' चांगले म्हणती, 'दुष्कार्या' म्हणती वाईट ।
'कार्य' कार्यालयी होते,  'मत्कार्य' माझे असे ॥


'कामकाज' होतं सर्वत्र, 'काजं' गुंडीसवे रत ।
'कृषीकाज' पिकविते अन्न, 'वैश्यकाज' देतघेत ते ॥


'काम' मोहास कारण हो, 'निष्काम' म्हणुनी असा ।
'नाकाम' स्फोटही होती, 'घरकाम' भासते कठीण ॥