"कविता" सुंदर दिसते आहे

प्रेरणा: अजब यांची सुंदर कविता "गजल मनाशी जुळते आहे"
http://www.manogat.com/node/8681 


मात्राप्रेमींनी चू.भू.द्या.घ्या.


"कविता" सुंदर दिसते आहे
उरात माझ्या घुसते आहे


तिला न कळले माझे मन
सतत मला हे छळते आहे


तिचेच असावे खेटर बहुदा
गालांवर जे हुळहुळते आहे


बीना पिता ना कळेल तुला 
कसे सभोवार  डुलते आहे


लघुशंकेला जाण्याची घाई
गाठ कुठे पण सुटते आहे


उजाडले इतक्यात कशाला?
अजून कालची उतरते आहे


पिके घेतो मी विडंबनाची
"जमीन" आयती मिळते आहे


  -(शेतकरी)अनिरुद्ध अभ्यंकर