का कौमुदी खुलेना, का काजवा जळेना
अंधार काय झाला, का मेण पाघळेना
का आज तु अबोली, काय आरसा म्हणाला
कि आज तव मनीचा, सारंग कुणी छेडला
शृंगार तव तनुला, भलताच माप झाला
फासुन काजळे ती, केलास चंद्र काळा
निस्तेजल्या तारका, राहू नरम झाला
का करशी कहर तु ऐसा, तो सुर्यही म्हणाला
पाहुन आपल्याला, का श्वास तो जळाला
ये दूर कुठे जाउ, न सांगता कुणाला
-प्रशांत