ती जताना "हाच मेला" म्हणून गेली..

प्रेरणा: प्रसाद यांची सुंदर कविता "ती जाताना 'येते' म्हणून गेली"
http://www.manogat.com/node/8661
मात्राप्रेमींनी चू.भू.द्या.घ्या.


ती जाताना "हाच मेला" म्हणून गेली
मरण्याचे माझ्या करणं बनून गेली


तसे पाहता मी काहीच केले नव्हते
कळले न का ती इतके चिडून गेली


म्हटले त्यांना मी काही केले नाही
पण जनता सगळी हात धुऊन गेली


ठसठसत्या खुणा आता सर्व अंगावर
बदला कोणत्या जन्माचा घेऊन गेली


दिसते त्याहून भलतीच निघाली चालू
जखमांच्या माझ्या चौकशी करून गेली


मी बंद करतो खिडक्या दारे सारी
नुसती जरी ती माझ्या गल्लीतून गेली


  -(घाबरलेला) अनिरुद्ध अभ्यंकर