आठवे मला -२

परवाच विसोबा खेचरांनी मनोगती घडवून आणलेली "काही प्रश्न" ही चर्चा वाचली .त्याची आठवण ताजी होती आणि आज स्नेहदर्शन यांची सुंदर कविता "आठवे मला" आणि खोडसाळांच "आठवा मला" हे विडंबन वाचलं आणि मलाही गुन्हा करावासा वाटला. नेहमी प्रमाणे
मात्रा प्रेमींनी चु.भू.द्या.घ्या.


आठवे आता तिचे सांगणे पुन्हा पुन्हा
व्यसन सोड हे विनवणे पुन्हा पुन्हा


रोज हेच व्हायचे लावता क्षणी बार
बोलणे कसे बसे थुंकणे पुन्हा पुन्हा


रोखली किती जरी तलफ रोज यायची
अन असेच बार मी लावणे पुन्हा पुन्हा


कर्करोगाचा आता त्रास सोसू किती?
आसवे अशीच मग ढाळणे पुन्हा पुन्हा


पाहतो जिथे तिथे मरण सावली आता
का असे मला त्याचे भासणे पुन्हा पुन्हा


ठरवले किती जरी विडंबने न लिहायची
करी पाप लेखणी नकळत पुन्हा पुन्हा


  -अनिरुद्ध अभ्यंकर