जपान बद्दल

कामानिमित्त ४-५ दिवसांसाठी मी टोकियो आणि फुजी सिटी इथे जाणार आहे.  प्रत्येक ठिकाणी मला एक एक दिवस मोकळा मिळेल.  तेव्हढ्यातच काही विशेष बघता/करता येईल का?


अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून टोकियो (नरिटा) हा थेट १० तासांचा प्रवास आहे.  त्यामुळे भ्रमण-वेळ बदलाचा (जेट लॅगचा) कितपत त्रास होईल?  जपानची प्रमाण वेळ आणि पॅसिफिक प्रमाण वेळ यात +१७ (किंवा १दिवस-७ तास) असे अंतर आहे.  त्यामुळे तिथून मी बुधवारी दुपारी निघून घरी त्याच बुधवारी पहाटे पोहोचणार याची गंमत वाटते.


मनोगतींपैकी कोणाला याबाबत माहिती असेल तर मला जरूर कळवा. व्य. नि. किंवा इथेच लिहिलेत तर उत्तम होईल.


कलोअ,
सुभाष