कॉन्फेस्ट
चित्र रंग
आणि मग मी अनु ला शोधायला लागलो.
अनु अजुनही पेंटींगच्या शमीयान्यातच असेल असे वाटून मी तेथे गेलो, पण ती तीथे नव्हतीच. तिथे खुपसे रंग मोठ्या पाच-पाच लिटर च्या कॅन्स मध्ये ठेवलेले होते. एक मोठ्या कागदांच गट्ठा एक टेबलवर होता. आणि अर्थातच खूप चित्रविचित्र प्रकरचे ब्रशेस. काही लोक लाकडी स्टँड वर कागद (आणि मन) लावून चित्र कढण्यात मग्न होते. ते काय चित्र काढत आहेत हे पहायला मी जरा डोकावलो आणि चाट च पडलो!
एक पलंग एका बाजूचे दोन पाय कापून तिरपा करुन ठेवला होता. त्यावर एक अस्ताव्यस्त टाकलेली दुलयी. शिवाय काही ओढण्या. खाली असलेल्या भागा पासून जमिनीत पुरलेला एक खांब पलंगातून घुसून वर गेलेला. या सगळ्यावर एक संपूर्ण विवस्त्र माणूस डोकं खालच्या भागाकडे करुन हातात खांब धरुन चमत्कारीक अवस्थेत अगदी स्थीर पणे पडलेला!
या सगळ्याचे एक माणसाने खरच मस्त चित्र नुस्त्या पेंसिल रेखाटले होते. एक मुली ने पण नुस्त्या बोटांनी छान चित्र कढले होते. मुख्य म्हणजे त्या मॉडेल माणसाच्या चेहेर्या वरचे अड्कून बसल्याचे भाव पण छान उतरले होते.
मी परत बाहेर पडलो, इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. अनु समोरच, क्ले मॉडेलींग चे साहीत्य होते, तिथे होती. तीला आवाज दिला, आणि आम्ही परत निघालो.
एका ठिकाणी गर्दी दिसली, पहीले तर खाण्यापिण्याचे स्टॉल्स! बरेचसे लोक रांगा लावुन खाण्याचे पदार्थ घेत होते.
मला खुपच आनंद झाला पण मी पाकीट आणलेच नव्हते. अनु ला तिथेच थांबवुन मी परत चालत चालत जाउन तंबूतून पकिट घेउन आलो.
---
हा खाण्यापिण्याचा भाग मस्तच होता. एकदम राजेशाही! आणि एक मोट्ठा बोर्ड - 'इंडीयन चाय' . मला एक्दम बरं वाटलं. पटकन वडापाव खावासा वाटला, पण इथे कुठे मिळायला तो?
त्या चाय वाल्या दुकानात थायी पदार्थ विकायला होते. आणि चहा मध्ये साखरेच्या ऐवजी मध, तो पण हवा तेवढा, एक बुधलाच ठेवला होता! आम्ही दोघांनी मिळून एक ट्रे घेतला - ऱाईस, आणि एक भाजी - नारळी भाता सारखी होती चव! पण त्या सगळ्या मिश्र वातावरणात मस्त लागला. गार्गी ने पण चांगला खाल्ला.
तीला तर त्या भागात सगळी कडे फिरायचे होते. आणि पट्ठी सगळ्यांकडे जात होती. बरेच लोक तीला उचलून वगैरे घेत होते. ती पण हसून बघुन मजा करत होती. मी आणि अनु तिला उचलून उचलून परत आणत होतो.
अनुला मी लाकडं वाजवण्याचा किस्सा सांगतच होतो तर तेवढ्यात तिथे, ती " बॉलीवुड, बॉलीवुड डांस!" म्हणून नाचणारी मुलगी तिथे आली आणि म्हणाली ' युअर पार्ट्नर इज अ गूड ड्रमर - ही मेड अस ऑल डांस" तीच्याशी गप्पा मारतांना कळलं की, ती भारतात खुप फिरुन आली आहे. आणि तीला भारत येवढा आवडला की आता ती दिल्ली मध्ये टुरीस्ट गाईड म्हणून काम करते आहे.
अजून एक हे सगळं ऐकणारी बाई तिथे होती तिने विचारले, यु आर इंडीयन, डु यु नो साईबाबा? मी गारच झालो.
तीने पुढे सांगितले 'व्हेन आय प्रे आय सी हीम' आणि पण बरच काही सांगत बसली. ती, तीचा डिव्होर्स, तीची मुलं, त्यांची आजारपण. आणि 'सत्य' साईबाबांनी केलेली मदत!
मला झोपच यायला लागली! पोटातही पडलं होतं. कसं बसं संभाषण उरकून आम्ही परत तंबूकडे निघालो.
जातांना एका ठिकाणी एक चमत्कारीक बोर्ड दिसला- सेक्सेस धीस ईव्हीनिंग - आणि
त्याखालीच एक बाण -
एका दूरच्या तंबू कडे दाखवणारा.
क्रमशः