नाव मी घेऊ कुणाचे?

प्रेरणा मानस यांची गझल रक्त वाहे दंगलीचे,


नाव मी घेऊ कुणाचे?
माधुरीचे.. श्यामलीचे!

पावलांनो ध्यान ठेवा
भय मला घसरण्याचे


सोडूनी रस्ता सुखाचा
शोध घेती उकिरड्यांचे


बोहलं तीचा न झाला
दैव तिचे रखेलीचे


आमचे नाते असे की
लाज वाटे सांगण्याचे


काल निघाले वाभाडे
इथे माझ्या इभ्रतीचे


अडकूनी पायी तीच्या
कास सुटे धोतराचे

काय मी आता करावे
विडंबनाच्या सवयीचे


माफी करावी "मानस"

चुकले पुन्हा पामराचे

  -(शर्मिंदा) अनिरुद्ध अभ्यंकर