समांतर रेषा..

समांतर रेषांचं
दुःख
माझ्या इतकंच
तू ही जाणतेस
मान्य आहे
हे अंतर कधीच
संपणार नाही
निदान
कमी तरी
करता येईल?


- अनिरुद्ध अभ्यंकर