गजर..

आमची प्रेरणा स्नेहदर्शन यांच्या सुरेख कविता गझल


काल रात्री झोपताना लावला होता गजर
नकळता झोपेत आणि बंद केला मी गजर


बाहुपाशी माधुरीच्या सूटली होती सबर
ह्या अश्या स्वर्गीय वेळी वाजला मेला गजर


बॉसला खडसावले मी तासले होते जबर
जाग आली खडबडोनी गर्जला जेव्हा गजर


आज थोडा लेट झाला बॉसला झाली खबर
नेमका असताच घाई होत नाही हा गजर


चांगल्या काव्यास शोधी बेरकी माझी नजर
वेळ भरली आज माझी सांगतो आहे गजर


-अनिरुद्ध अभ्यंकर