श्रीखंड प्रकार १

  • केफ़िर चीज (लेबनी) नावाचे दही १ डबा
  • वेलची जायफ़ळ पूड पाव चमचा
  • बदाम काजु पिस्ते काप ५ चमचे
  • केशर चिमुट्भर
  • साखर १:१ प्रमाण
१५ मिनिटे
दोन/तीन जणांना

केफ़ीर चीज (लेबनी) दह्यामधे १:१ याप्रमाणे साखर घालून चमच्याने ढवळणे. त्यामधे बदाम काजु पिस्ते काप, वेलची जायफ़ळ पूड, केशर घालून परत ढवळ्णे.  झाले श्रीखंड तयार.

दह्याला रात्री बांधुन ठेवायची गरज नाही.  केफ़ीर चीज लेबनी या दह्यामधे अजीबात पाणी नसते.

हे दही अमेरीकेत कोणत्या दुकानामधे मिळते माहीत नाही. हे श्रीखंड मी एका विद्यार्थ्याकडुन शिकली आहे.  तो हे दही एका इंटरनॅशनल शॉपमधुन आणायचा (डेंटन, टेक्सास)

नाहीत.

एक विद्यार्थी सौमित्र गोडबोले