आपल्या दोघा असा शाप का?

आमची प्रेरणा प्रसाद यांची आधुनिक गझल आपल्या दोघांमधे ही गॅप का?


आपल्या दोघा असा शाप का?
पाहतो चोरून तुझा बाप का?


रोज धावतो 'दहा'चे लॅप मी
पाहताच तुला लागे धाप का?


भेटतो तेव्हा मुका मी राहतो
सूटतो पायास माझ्या काप का?


जवळ येताना असा का चेहरा?
नेहमी डोक्यात तुझ्या पाप का?


राहतो राणी तुझ्या हृदयात मी
मारतो आहेस मला तू थाप का?


केशवसुमारा किती खोड्या तुझ्या
काढशी कवींचे उगा तू माप का?


- (शिंपी)केशवसुमार