असुयेने मळमळलेला

शेजाऱ्यावर जळलेला
असुयेने मळमळलेला

तो राणे वरचढ होता
बघ विलास जळफळलेला

हे कसले डाग म्हणावे?
प्यालाही डचमळलेला

मोक्षाशी खेळत होता
अर्थाने ढासळलेला

भादव्यास चैत्र म्हणाला
महिन्याने गोंधळलेला

मी गाणे म्हटले आणिक
हर श्रोता तळतळलेला

छातीचा फुंकुन झाला
भाताही फासळलेला

पंक्चरती बाण कशाला?
हा देह न वातुळलेला

यमकांचा अवघड सांधा
जुळता जुळता जुळलेला

आमची प्रेरणा - सारंग ह्यांची गझल हा जीव असा जळलेला