कडबू

  • हरभरा डाळ १ वाटी
  • साखर ११/४ वाटी
  • वेलची पूड, जायफ़ळ पूड १ टीस्पून
  • सूका मेवा (आवड्त असल्यास)
  • कणिक ११/२ वाटी
  • मैदा ४ टे‌स्पुन
  • तूप तळण्याकरता
  • तेल ३ टे. स्पून कडकडित तापवून घेणे
दीड तास
४ जण

आधी हारभरा डाळ धुवुन कुकर मधे शिजवुन घ्यावी.कुकर गार झाल्यावर डाल

चाळणी वर उपसून घ्यावी,आणी कट काढावा. नन्तर रवीने डाळ थोडी घोटुन घ्यावी. मग त्यात साखर घालुन शिजायला ठेवावी. शिजत असताना सारखी ढ्वळावी..मिश्रण घट्ट झाल कि डाव त्यात उभा करुन बघावा.तो जर पड्ला नाही म्हण्जे पुरण झाल म्हणायच̱. गार झाल्यावर सुका मेवा आणी पूड घालायची.

डाळ शिजत असतानाच कणिक, मैदा, थोड मीठ, तेलाच मोहन घालून घट्ट भिजवुन घ्यावी आणी झाकुन ठेवावी.

पुरण झाल कि तूप तापायला ठेवाव.इकडे करंजी प्रमाणे लहान पुरी लाटुन त्यात पुरण भराव आणी बंद करून कडेला मुरड घालावी,आणि गरम तुपात तळून घ्यावे. ह्याप्रमाणे सर्व कड्बू करावेत.

तुपाबरोबर खण्यास द्यावे.

मला हा पदार्थ माहित नव्हता. लग्न झाल्यावर सासरी खाल्ला आणी  आवड्ला. करून बघितला ...

 

हमखास पाकसिद्धि पुस्तक