संक्रांत -२

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची संक्रांत


एवढा आता आकांत कशास?
शोधला आधी एकांत कशास?


एवढे मारले निखळले अंग
माझ्यावर ही संक्रांत कशास?


ही जरा तनुची, तारुण्य मनात
प्रियेने वदावे वेदांत कशास?


माणसे न कोणी वानरे सारी
मानव झाला उत्क्रांत कशास?


भांडणे सारी आता "आपापसात"
मनोगती झाला दृष्टांत कशास?


वृत्ताशी कधी जमले ना माझे
"के.सु."ला इथे देहांत कशास?


-केशवसुमार