मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय

मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय


ते एकमेकांत हरवून जाण
एकमेकांना फुलासारखं जपण
रेशमी बंधांना पुन्हा एकदा विणावंस वाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय


तुझी ती गुलाबी पत्र
ती पुनवेची रात्र
सार सार काही पुन्हा अनुभवावंस वाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय


तुझा पहिला वहीला स्पर्श
तुला लपवता न आलेला हर्ष
तसंच तू पुन्हा एकदा लाजून दाखवावंस वाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय


तुझं लाड लाड मला सार जग बक्षिसं देणं
जोषात येऊन मी तुला चांदणं तोडून देणं
स्वप्नांच्या त्या विश्वात मला पुन्हा जगावंस वाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय


तुझं मला वेडू म्हणून हाक मारण
मी चिडलो की तुझं दिलखुलास हसणं
तुझ्यासाठी पुन्हा एकदा वेड व्हावंस वाटतंय
मला पुन्हा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतंय


-अनिरुद्ध अभ्यंकर