क्रमप्राप्त

ही मनाची उधाणे
ती कर्तव्याची कुंपणे
ते संयमाला जुंपणे
क्रमप्राप्त!

ही अटळ आडवळणे
ती क्षणमिठी कवटाळणे
ते काळीज तुटणे
क्रमप्राप्त!

ते माउलीस कष्टणे
ते वासनेत डुंबणे
ते जाणे येणे
क्रमप्राप्त?