शेंगदाण्याची खमंग चटणी

  • शेंगदाणे १ कप
  • सुक्या लाल मिरच्या - ५-६
  • कढीपत्त्याची पाने - कपभर
  • मीठ, साखर चवीप्रमाणे.
  • तेल.
१५ मिनिटे
घरातल्या सगळ्यांसाठी..

एका जाड बुडाच्या कढईत तेल घालावे. तेल तापले की त्यावर शेंगदाणे, कढीपत्त्याची पाने, आणि लाल मिरच्या हे सगळे वेगवेगळे परतून घ्यावे. दाणे आणि मिरच्या करपवू नयेत. त्यानंतर हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घालून थोडे भरड वाटून घ्यावे. वाटताना त्यात चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालावी. खूप साखर घालू नये.

हि चटणी बाऊल मध्ये काढून त्यावर परत थोडेसे (साधारण १ चमचा) तेल सोडावे...म्हणजे ही चटणी लवकर मऊ पडत नाही.

ह्यात दही घालून पण छान लागते.

हि तिखट चमचमीत चटणी, पोळी, पराठा, डोसा यावर पसरून घालावी आणि त्याची सुरळी करून खावी.. वा...!

आई (सासूबाई)