क्रमप्राप्त -२

आमची प्रेरणा जयन्ता५२ यांची कविता क्रमप्राप्त!


प्यावेसे वाटणे
मित्रांचे भेटणे
संयमाचे सुटणे
क्रमप्राप्त!

एक नंबर लागणे
घाई घाईने उठणे
ग्लासांचे तुटणे
क्रमप्राप्त!

ते रात्रभर पिणे
आणि शुद्ध जाणे
चालता न येणे
क्रमप्राप्त!

नवी कविता दिसणे
विडंबन सुचणे
केशवाला लिहिणे
क्रमप्राप्त!

(बेशुद्ध) केशवसुमार