वा हवा

आमची प्रेरणा जयश्री अंबासकर यांची पद्मजा फ़ेणाणींनी गायलेली विवेक काजरेकरांच्या"स्पर्श चांदण्यांचे" या अल्बम मधली रोमँटिक कविता गारवा


पोरगा वस्तीतला
रसिक होऊ लागला
माडीवर दंगला
वा हवा, वा हवा


लोक 'हलके' बोलती
कानी हळूच कुजबुजती
गजरा हाती गुंफ़िती
वा हवा, वा हवा


हळूच मंद हासली
थोडीशी ती वाकली
आणि थोडी लाजली
वा हवा, वा हवा


पावशेर लावतो
सगळ्यांना छेडितो
स्वतःशीच बरळतो
वा हवा, वा हवा


धन्य तू "केशवा"
निर्लज्ज मानवा
पुरे तुझी गाढवा
वा हऽऽवा, वा हऽऽवा


-केशवसुमार