संकल्प !

लाभेल संग जो जो त्याचाही लाभ घेऊ ।
येईल प्रसंग जो जो त्याला तरून जाऊ ॥
उठतील तरंग जे जे त्यांचा प्रकार पाहू ।
दिसतील रंग जे ते नयनी भरून घेऊ ॥